गळाभेट आणि बिर्याणी खाऊन विदेश नीती करता येत नसते, डॉ. मनमोहन सिंग यांनी मौन सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जात, धर्म, प्रदेशाच्या नावावर पेंद्रातील मोदी सरकार जनतेत फूट पाडत आहे. भाजपचा राष्ट्रवाद ‘फेक’ असून ब्रिटिशांप्रमाणे ‘फोडा आणि राज्य करा’ असे तुमचे धोरण आहे, असा जबरदस्त हल्लाबोल माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी केला. शेजारील देशांशी आपले संबंध बिघडत आहेत. बळजबरीने गळाभेट घेणे, निमंत्रण नसतानाही तिथे जाऊन बिर्याणी खाणे, अशाने विदेश नीती करता येत नसते, असा सणसणीत टोला डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या रणधुमाळीत ज्येष्ठ अर्थतज्ञ, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्हिडीओद्वारे केंद्र सरकार, भाजप आणि नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधाला. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या पंजाबमधील अबोहार येथील सभेपूर्वी काँग्रेस पक्षाने डॉ. मनमोहन सिंग यांचा व्हिडीओ प्रसारित केला. नऊ मिनिटांच्या या व्हिडीओत डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या नेहमीच्या संयमी भाषेत, परंतु ठामपणे देशातील वाढती बेरोजगारी, मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे विस्कटलेली आर्थिक घडी, महागाई, वाढता सामाजिक तणाव, फसलेली विदेश नीती, चीनची घुसखोरी, शेतकऱयांचे प्रश्न, पंतप्रधान मोदी यांनी अचानक पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफ यांची घेतलेली भेट आदी मुद्दय़ांवर हल्लाबोल केला आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांचे खडेबोल

 पंतप्रधान असताना मी बोलण्यापेक्षा कामावर भर दिला. राजकारणातील फायद्यासाठी देश दुभंगेल असे काही केले नाही. पण भाजप सरकार जात, धर्म, प्रदेशाच्या नावाखाली जनतेत फूट पाडत आहे. भाजपचा राष्ट्रवाद फेक आहे. ब्रिटिशांप्रमाणे ‘पह्डा आणि राज्य करा’ ही त्यांची नीती आहे.  पेंद्रातील भाजप सरकारचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे अपयशी ठरले आहे. गेल्या एक वर्षापासून चिनी लष्कराने घुसखोरी करून आपल्या देशाच्या पवित्र भूभागावर कब्जा केला आहे.  शेजारील देशांशी संबंध बिघडले आहेत. जुने मित्र आपल्या देशापासून दूर जात आहेत. बळजबरीने गळाभेट घेणे, निमंत्रण नसतानाही अचानक तेथे जाऊन बिर्याणी खाणे याला विदेशनीती म्हणत नसतात. अशा कृतींमुळे इतर देशांशी संबंध सुधारत नाहीत.  या सरकारच्या अर्थिक नीतीमुळे शेतकरी, विद्यार्थी, महिला, उद्योजक हे सर्व घटक प्रचंड अडचणीत आहेत. सामाजिक विषमता वाढत आहे.  माझ्याविरुद्ध आणि यूपीए सरकारविरुद्ध हेतुपुरस्पर खोटा प्रचार भाजपच्या ‘बी’ आणि ‘सी’ टीमद्वारे केला गेला हे सिद्ध झाले आहे.

खडेबोल

 सध्या देशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. कोरोनाकाळात पेंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली असून बेरोजगारी, महागाई वाढली आहे. सामान्य जनता त्रस्त आहे. मात्र गेली साडेसात वर्षे सत्तेवर असलेले हे सरकार स्वतःच्या चुका कबूल करायला तयार नाही. उलट हे सरकार पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना दोष देत आहे. इतिहासावर दोष ढकळत स्वतःचे पाप कमी होत नाही हे लक्षात घ्या.
 देशात समस्यांचा डोंगर असताना, जनता त्रस्त असताना हे सरकार मात्र अलबेल असल्याचे चित्र रंगवत आहे. या सरकारच्या प्रत्येक धोरणात स्वार्थ, द्वेष आणि समाजात विभाजन आहे.

पंजाब आणि पंजाबी जनतेची बदनामी, अपमान करण्याचा प्रयत्न

शेतकरी आंदोलनावेळी पंजाब आणि पंजाबी जनतेची बदनामी आणि अपमान केला गेला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत फिरोजपूर येथे जे झाले त्यावरून पुन्हा असाच बदनामीचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनाही बदनाम केले गेले याकडे डॉ. मनमोहन सिंग यांनी लक्ष वेधले. पंजाबच्या जनतेची देशभक्ती, त्याग याला अवघे जग सॅल्यूट करते. मात्र भाजप सरकार याविषयी साधे बोलतही नाही, असे ते म्हणाले.

तुम्ही साडेसात वर्षे सत्तेवर आहात. चुका कबूल करण्याऐवजी प्रत्येकवेळी पंडित जवाहरलाल नेहरूंना जबाबदार धरले जात आहे. पंतप्रधानपदाला स्वतःची प्रतिष्ठा आहे, पण इतिहासाला जबाबदार धरल्यामुळे तुमचे पाप कमी होत नाही.  डॉ. मनमोहन सिंग