
मुंबईकरांना पावसाळ्यात पाणी तुंबण्यापासून दिलासा देण्यासाठी पालिकेने उन्हाळा सुरू होत असतानाच नालेसफाईचे नियोजन केले आहे. यासाठी 7 झोनमध्ये नालेसफाईच्या कामासाठी सुमारे 130 कोटींचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात आले आहेत. 1 एप्रिलपासून नालेसफाई सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन अजून 31 मेपर्यंत 80 टक्के नालेसफाई पूर्ण करण्यात येणार आहे.
मुंबईत छोटे नाले, मोठे नाले आणि रस्त्यालगतच्या जलवाहिन्या, पाणी निचरा होण्याची ठिकाणे यामध्ये येणारी माती, घाण, कचरा, गाळामुळे अनेक वेळा भरल्याचे प्रकार घडतात. छोटे नाले व रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांमधून सांडपाणी आणि काही प्रमाणात गाळ वाहून नेला जातो. मात्र छोटय़ा नाल्यांचा काही भाग भरती-ओहोटी भागात येत असल्यामुळे पाण्याचा निचरा न होता गाळ साचून राहतो. त्यामुळे अतिवृष्टीत या नाल्यांमधील पाणी शहरात घुसण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून पावसाळ्याआधी नालेसफाईचे काम हाती घेण्यात येते.
असे होणार काम
- नालेसफाईच्या पहिल्या टप्प्यात पावसाळापूर्व काम केले जाणार आहे. यामध्ये 31 मेपर्यंत पहिला टप्पा संपणार आहे. या टप्प्यात एकूण गाळापैकी 80 टक्के गाळ काढला जाईल.
- दुसरा टप्पा पावसाळ्यातील कामाचा असून यामध्ये 10 टक्के नालेसफाई केली जाणार आहे. हा कालावधी 1 जून ते 30 सप्टेंबर असा राहणार आहे.
- तिसऱया टप्प्यात पावसाळ्यानंतर 10 टक्के काम केले जाणार आहे. यामध्ये 1 ऑक्टोबर ते 31 मार्च 2023 या कालावधीत नालेसफाईचे काम केले जाणार आहे.
गाळाच्या वजनानुसार कंत्राटदाराला पैसे
पालिकेच्या अटीनुसार गाळ काढणे, साठवणे, वाहून नेणे व त्याची विल्हेवाट लावणे जबाबदारी या सर्व कामांची जबाबदारी पंत्राटदारावर राहणार आहे. कंत्राटदाराने काढलेल्या गाळाच्या वजनानुसारच कामाचे पैसे दिले जाणार आहेत. गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेचे स्वतंत्र डंपिंग ग्राऊंड नसल्याने गाळ मुंबईच्या हद्दीबाहेर वाहून न्यावा लागणार आहे. मोठय़ा नाल्यांतील गाळ काढण्यासाठी, तरंगता कचराही काढण्यासाठी मनुष्यबळासह सिल्ट पुशिंग पन्टून मशीन, मल्टिपर्पज ऑफ्मिबीअस पन्टून मशीन यांचा वापर करता येणार आहे.
असा होणार खर्च
परिमंडळ 1 2 कोटी 71 लाख
परिमंडळ 2 5 कोटी 21 लाख
परिमंडळ 3 10 कोटी 19 लाख
परिमंडळ 4 12 कोटी 47 लाख
परिमंडळ 5 15 कोटी 24 लाख
परिमंडळ 6 9 कोटी 50 लाख
परिमंडळ 7 10 कोटी 27 लाख
पश्चिम उपनगर छोटे नाले 61 कोटी

























































