यूक्रेनच्या अणुभट्टीवरील हल्ल्याने सेन्सेक्सवर परिणाम, 1100 अंकांनी कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशिया आणि यूक्रेनमध्ये आता परिस्थिती अजून बिघडत चालली आहे. रशिया यूक्रेनवर हल्ला करून त्यांची शहरं उद्ध्वस्त करत आहे. या दरम्यान, यूक्रेनच्या झेपोरिझिया या युरोपमधील सर्वात मोठी अणुभट्टीवर रशियाने हल्ला केला आहे. या हल्ल्याचे पडसाद शेअर बाजारावर पडले आहेत.

रशिया आणि युक्रेनमधील तणावाचा जगभरातील शेअर बाजारावर परिणाम दिसून येत आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला आहे. सकाळी 10.40 वाजता बीएसई सेन्सेक्स 1104.2 अंकांनी दोन टक्क्यांच्या घटीसह 53,998.26 अंकांवर आला होता. तर एनएसई निफ्टी 291 अंक अर्थात 1.77 टक्क्यांनी घसरून 16,206.25वर आला.

अनेक नामांकित ब्रँड्सचे शेअर 4.51 टक्के इतके घसरले आहेत. यात एशियन पेंट्स, मारुती सुझुकी इंडिया, अॅक्सिस बँक, विप्रो, महिंद्रा अँड महिंद्रा यांचा समावेश आहे.