
नगर जिह्यात मालमत्ताविषयक गुह्याकरिता कुख्यात असलेल्या सागर भांड टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भांडचे वडील पुणे पोलीस दलात कार्यरत होते.
राहुरी पोलीस स्टेशन येथे मयूर दिलीप देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा कुख्यात सागर भांड टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भांडसह टोळीतील अन्य पाच सदस्यांना अटक करण्यात आली होती. भांड टोळी संघटितपणे जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत निर्माण करीत होती. या गुह्यातील विशेष बाब म्हणजे टोळीप्रमुख सागर भांडचे वडील पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत होते. तरीदेखील गुन्हेगाराला कोणतीही सहानुभूती न दाखवता जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न नगर पोलिसांकडून करण्यात आला आहे.
या गुह्याची गांभीर्याने दखल घेऊन ‘मोक्कां’तर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांना सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला त्यांनी मंजुरी दिली असून, तपास श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
सागर भांडविरुद्ध दरोडा, अपहरण, फसवणूक, अवैध शस्त्र वापर असे तब्बल 27 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुह्यांचा तपास करीत असताना हा गुन्हा फौजदारी कट रचून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने 120(ब), व गुन्हा करून पुरावे नष्ट केला म्हणून 201 ही वाढीव कलमे या गुह्यात लावण्यात आली आहेत.

























































