Pune – अवैधरित्या सावकरी करणाऱ्या तिघांना अटक, सहाजणांविरूद्ध गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवैधरित्या सावकारी करून एकाला खंडणी मागणाNया तिघांना खंडणी विरोधी पथक एकने अटक केले. त्यांच्याविरूद्ध महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार लोणीवंâद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यंकटेश नागेंद्र चोक्कारपू (वय 52) शांतीलाल देवराम पाटील (वय 59) वसंत कुमार राममिलन मिश्रा (वय 56 तिघेही रा. वाघोली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शहरात अवैधरित्या सावकारी करणाNयाविरूध्द कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत त्यानुसार आरोपी सुभाष मांडोळे, व्यंकटेश चोकारप्पु हे अवैध सावकारी करून एकाला खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा तक्रारी अर्ज खंडणी विरोधी पथकाला प्राप्त झाला. पथकाने चौकशी करून याप्रकरणी चौक्कारपू, पाटील आणि मिश्रा यांना अटक केले. इतरांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने, एपीआय विवेक पाडवी, उपनिरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, मधुकर तुपसौंदर्य, रविंद्र फुलपगारे, हेमा ढेबे, मिना पिंजण, किशोर वग्गू यांनी केली.