
20 रुपयांची लालूच दाखवून एका 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक झाली असून तो तिचा शेजारी असल्याची माहिती मिळत आहे.
या आरोपीचं नाव मयूर असं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर आणि पीडिता हे शेजारी आहेत. घटनेच्या दिवशी त्याने तिच्या घरी कुणीही नसल्याचा गैरफायदा घेत त्याने आधी तिची छेड काढली. नंतर 20 रुपये देण्याचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला.
या अत्याचारानंतर ती घाबरून राहू लागली. हा प्रकार अनेकदा तिच्यासोबत घडला. एक दिवस तिच्या पोटात दुखू लागल्याने तिने हे सगळं आपल्या आईला सांगितलं. पीडितेच्या आई वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे पोलिसांनी अजिबात विलंब न करता आरोपीला अटक केली.
























































