बंद पडलेल्या हयात रिजन्सीच्या कर्मचाऱ्यांना मदतीचा हात, 200 कर्मचाऱ्यांना होळीनिमित्त अन्नधान्याचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या आठ महिन्यांपासून बंद पडलेल्या ‘हयात रिजन्सी’ या पंचतारांकित हॉटेलमधील कर्मचाऱयांना भारतीय कामगार सेना व ‘जाणीव’ संस्थेने मदतीचा हात दिला आहे.  होळीनिमित्त या कर्मचाऱयांच्या कुटुंबीयांना पुरणपोळीचा आस्वाद घेता यावा यासाठी 200 कर्मचाऱयांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. त्यात गूळ, चणाडाळ, मैदा, तेल यांचा समावेश होता.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्य करीत असलेल्या ‘जाणीव’ या संस्थेने या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगळीच सामाजिक जाणीव प्रगट केली. मुंबई विमानतळाशेजारी असणारे हे ‘हयात रिजन्सी’ हॉटेल पूर्ववत सुरू व्हावे यासाठी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत हे प्रयत्न करीत आहेत.

याप्रसंगी ‘जाणीव’चे प्रकाश शिरवाडकर, दिलीप जाधव, बाळा साटम, संजय ढोलम, भारतीय कामगार सेनेचे मनोज धुमाळ, सत्यवान पवार, मीनल मांजरेकर आदी उपस्थित होते.