रस्त्यावरील डेब्रिजप्रकरणी मेट्रोच्या इंजिनीयरला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्यावरील पडलेल्या डेब्रिजप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी मेट्रो 2 (बी) च्या इंजिनीयरला अटक केली. व्यंकटरमणा लक्ष्मण कोरडा असे त्याचे नाव आहे. त्याची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नागरिकांच्या संबंधित समस्या सोडवण्यास सुरुवात केली. शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावर पार्क केलेल्या बेवारस गाडय़ांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. त्याला मिळणाऱया प्रतिसादानंतर आयुक्तांनी रस्त्यावर विकासकामे पूर्ण झाल्यानंतर डेब्रिज न उचलणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.

मुंबईत सध्या विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. काही ठिकाणी कामे झाल्यानंतर तो कचरा तसाच पडलेला असतो. कंत्राटदार कामे झाल्यानंतर तो कचरा तसाच टाकून देतो. त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना होत असतो. रस्त्यावर कचरा/डेब्रिजबाबतच्या तक्रारीचे ट्विट मुंबई पोलिसांना येत आहेत. डी. एन. नगर पोलीस ठाण्यासमोर मेट्रो 2 (बी) चे काम सुरू आहे. पिलर क्रमांक 16 आणि 17 दरम्यान डेब्रिज टाकण्यात आले होते. डेब्रिजप्रकरणी डी. एन. नगर पोलिसांनी ‘सुमोटो’ कारवाई करून मेट्रोच्या कंत्राटदार आणि जबाबदार व्यक्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुह्याचा तपास हाती येताच डी. एन. नगर पोलिसांनी मेट्रोचे साइट इंजिनीयर व्यंकटरमणाला अटक केली.