शेकडो युवकांचे शिवबंधन बांधून युवासेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर लोकसभेचे युवासेना विस्तारक नित्यानंद त्रिपाठी यांच्या उपस्थितीत युवासेना उपजिल्हाप्रमुख कैलाश तेलतुंबडे यांच्या नेतृत्वात शहरातील तुकुम परिसरातील आझाद हिंद चौक येथे युवासेना शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. युवासेना विस्तारक नित्यानंद त्रिपाठी साहेब यांच्या उपस्थितीत शेकडो युवकांनी शिवबंधन बांधुन युवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलाश तेलतुंबडे, विधानसभा समनव्यक अमोल मेश्राम नवनियुक्त शाखा प्रमुख प्रवीण घोटेकर उप शाखा प्रमुख बाडू कुडमिथे, पप्पी यादव, इस्लाम शेख,विशाल कवने, अक्षय मेश्राम, भागेश उरकुडे, सैय्यद नूर, राजू नांदे सह शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती होती.