
अमरनाथ यात्रा यंदा 30 जूनपासून सुरू होणार आहे. जम्मू कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली श्रीअमरनाथजी श्राईन बोर्डाची बैठक झाली त्यात यात्रा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
जम्मू कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यात्रा सूरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 43 दिवसांची ही यात्रा 30जूनपासून सुरू होणार आहे. कोरोनाबाबतचे निर्बंध पाळत यात्रा होणार आहे. तसेच रक्षाबंधनच्या दिवशी परंपरेप्रमाणे यात्रेची समाप्ती होईल. तब्बल दोन वर्षांनंतर ही यात्रा होत आहे. त्यामुळे बैठकीत यात्रेचे नियोजन आणि विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.


























































