केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता वाढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने आपल्या कर्मचार्‍यांना गुढीपाडव्याची भेट दिली आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. हा भत्ता 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.

केंद्रीय कर्मचार्‍यांना सध्या 31 टक्के महागाई भत्ता मिळतो. त्यात 3 टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या निर्णयाचा फायदा 50 लाखांपेक्षा जास्त कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे.