सतत एसी लावल्याने उद्भवतात ‘या’ समस्या, करू नका दुर्लक्ष!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या उष्म्यामुळे आणि वाहणाऱ्या घामामुळे सगळेच हैराण होतात. उकाडा सुसह्य करण्यासाठी एसीचा आधार घेतला जातो. पण, सतत एसी लावल्याने प्रकृतीचं नुकसानही होऊ शकतं.

एसीच्या सवयीमुळे अनेक शारीरिक त्रास उद्भवू शकतात. त्यात पहिला त्रास म्हणजे रेस्पिरेटरी समस्या. घसा कोरडा होणं, नाक चोंदणं अशा समस्या उद्भवू शकतात. राइनायटिस नावाचाही एक त्रास उद्भवतो, ज्यात नाकाच्या आत जळजळ होते.

जे लोक अस्थमा आणि अॅलर्जीने ग्रस्त असतात, त्यांच्यासाठी एसी खूप जास्त धोकादायक आहे. असे लोक स्वतःला प्रदूषणापासून वाचण्यासाठी घरात कोंडून घेतात. पण, जर घरचा एसी स्वच्छ नसेल तर त्याने त्यांची समस्या आणखी वाढू शकते.

खूप जास्त वेळी एसीत राहिल्याने आपल्या नाकपुड्या कोरड्या होतात. त्यामुळे म्युकस मेम्ब्रेन्स या प्रक्रियेला अडथळा होऊन शरीरात विषाणू जाण्याची शक्यता वाढते. एसीत राहिल्याने शरीर डिहायड्रेट होतं आणि शरीराची पाण्याची पातळी कमी होते.

सतत एसीत राहून अनेकांना डोकेदुखी होऊ शकते. डीहायड्रेशनमुळे डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या भेडसावू शकते. एसीतून निघून थेट उन्हात गेल्यावर डोकेदुखी वाढू शकते. त्वचेवरही त्याचा परिणाम होतं. तसंच एसीत राहिल्याने डोळेही कोरडे होऊ शकतात.