
आयएनएस विक्रांतच्या नावाखाली खंडणी वसुल करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आज गुरुवारी क्रांतीचौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. शिवसैनिकांनी किरीट सोमय्याच्या फोटोला जोड्याने मारले. यावेळी किरीट सोमय्यांचे करायचे काय? खाली डोके वर पाय च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
सोमय्यांच्या फोटोला जोड्याने हाणले, पायाने तुडवले
संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या फोटोला पायातील जोड्याने मार-मार मारले, एवढ्यावरच न थांबता सोमय्याच्या फोटोला पायाखाली तुडवून देशद्रोह केल्याबद्दलचा संताप व्यक्त केला.
क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
आयएनएस विक्रांतच्या नावाखाली खंडणी वसुल करणाऱ्या किरीट सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दिली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, अशोक पटवर्धन, अनिल जैस्वाल, विरभद्र गादगे आदींची उपस्थिती होती.
माझ्या पाच हजाराचे काय झाले? जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांचा सवाल
आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्या यांनी मदतनिधी गोळा केला होता. यासाठी संभाजीनगर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी पाच हजार रुपयाची मदत केली होती. परंतु ही मदत दिल्यानंतर त्याची पावती मिळाली नाही. मी दिलेल्या पाच हजार रुपयाच्या मदतीचे काय झाले? असा सवाल जिल्हाप्रमुख नरेंद त्रिवेदी यांनी केला आहे.
जोडेमार आंदोलनाचा जोर
या निदर्शनात महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, आनंद तांदुळवाडीकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, विधानसभा संघटक राजु वैद्य, गोपाळ कुलकर्णी, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हा संघटक अनिता मंत्री, मीना फसाटे, दुर्गा भाटी, उपशहरप्रमुख हिरा सलामपुरे, राजेंद्र दानवे, जयसिंह होलिये, किशोर कच्छवाह, रमेश दहीहंडे, कृष्णा मेटे, हरिभाऊ हिवाळे, रमेश बहूले, सतीश निकम, संदेश कवडे, अनिल जयस्वाल, माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट वीरभद्र गादगे, अल्पसंख्यांक आघाडी जिल्हा संघटक समीर कुरेशी, व्यापारी आघाडी जिल्हा संघटक संजय लोहिया, सचिन वाघ, विनोद बोराखडे, चंद्रकांत देवराज, विशाल गायके, हरिभाऊ हिवाळे, दिनेश राजेभोसले, चंद्रकांत गवई, नितीन पवार, सुरेश फसाटे, देविदास पवार, नंदू लबडे, संजय कोरडे, रमेश सूर्यवंशी, रामदास पवार, अर्जुन गायके, सूर्यकांत सूर्यवंशी, किरण हडतगुने, अनिल लहाने, शिवाजी बचाटे, विजय शिंदे, रोहित शिंदे, नितीन भोणे, रणजीत ढेपे, विजय सूर्यवंशी, तुकाराम सराफ, शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटक आशा दातार, प्राजक्ता राजपूत, विद्या अग्निहोत्री, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, सविता निगुळे, शिल्पाराणी वाडकर, सुकन्या भोसले, ज्योती काथार, संध्या जाधव, सुनिता पाटील, रेखा फलके, संध्या रावले, रोहिणी काळे, अलका काकडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























































