
कांदिवली येथून आठ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार या कांदिवली परिसरात राहतात. त्यांचा मुलगा तीन दिवसांपूर्वी मित्रांसोबत विजयपार्क येथे गेला होता. सायंकाळी तो घरी न आल्याने त्याचा कुटुंबीयांनी शोध घेतला. तो कुठेही न सापडल्याने त्याच्या कुटुंबीयांनी कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. कांदिवली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.






























































