एलईडीमुळे लागलेल्या आगीत 2 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एलईडीमुळे लागलेल्या आगीत दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना गाजियाबाद येथे घडली आहे. या घटनेत मुलीची आई आणि बहीण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गाजियाबाद येथील नंदग्राम परिसरातल्या रिव्हर हाईट नावाच्या एका रहिवासी इमारतीत हा अपघात घडला. या इमारतीच्या चौथ्या टॉवरमधील तिसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये राहणारं कुटुंब दुपारच्या वेळी झोपलं होतं. त्यावेळी अचानक एलईडी बल्बमध्ये शॉर्टसर्किट झालं आणि आग लागली.

आगीमुळे खूप धूर निघू लागला आणि तो संपूर्ण फ्लॅटमध्ये पसरला. झोपलेल्या कुटुंबाला याची चाहुल न लागल्याने ते धुराने बेशुद्ध पडले. घरातून धूर निघत असलेला पाहून शेजारी पाजारी धावत मदतीला आले आणि त्यांनी दरवाजा तोडायचा प्रयत्न केला. पण, त्यांना यश आलं नाही. अखेर त्यांनी खालून शिडी लावून गॅलरीच्या मार्गाने घरात प्रवेश मिळवला.

त्यांनी घरात अडकून बेशुद्ध पडलेल्या आई आणि दोन मुलींना बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यातील दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं.