चंद्रपूर : ‘कॅफे मद्रास’ला भीषण आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या कॅफे मद्रास या हॉटेल ला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या लोकमान्य टिळक शाळेसमोरील कॅफे मद्रास या हॉटेलला सकाळी दहा वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. पाहता पाहता ही आग वेगाने वाढू लागली. या आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.

घटनेची माहिती चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या वाहनांनी आग आटोक्यात आणली असून आगीवर ताबा मिळवला आहे. या आगीमुळे हॉटेल मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीमुळे मुख्य मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर कॅफेला लागून असलेल्या लोकमान्य टिळक शाळेला सुट्टी देण्यात आली.