
शहरातील एका प्रसिद्ध शाळेतील मुख्याध्यापकाकडे खंडणीच्या स्वरूपात 12 हजार डॉलर बिटकॉइनची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याबाबत मुख्याध्यापकांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून सेक्सटॉशनचे प्रकार वाढत चालले आहे. सायबर ठग हे अश्लील व्हिडीओ कॉलच्या नावाखाली अनेकांकडून पैसे उकळत आहे. बदनामी होईल या हेतूने अनेकजण तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. सायबर ठगाने चक्क मुंबईतील एका प्रसिद्ध शाळेतील मुख्याध्यापकांकडून खंडणीच्या स्वरूपात 12 हजार डॉलर बीट कॉइनची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना व्हॉट्सअॅपवर एक पह्न आला होता. त्यानंतर एक महिला विवस्त्र्ा झाली. तिने मुख्याध्यापकांनादेखील कपडे काढण्यास सांगितले.
या घटनेनंतर काही दिवसांपूर्वी ठगाने मुख्याध्यापकांना मेसेज केला. सुरुवातीला त्या चॅट्सकडे त्यांनी दुर्लक्ष केले. या घटनेनंतर त्यांना एक ई-मेल आला. तुम्ही जे माझ्यासोबत केले आहे ते जगजाहीर करू, तुमचे फोटो आणि व्हिडीओ सर्वत्र व्हायरल करू असे सांगितले तसेच 12 हजार डॉलर बिट कॉइनची मागणी केली. ठगाने ई-मेलमध्ये मुख्यध्यापकांचा डेटा, कॉम्प्युटर हॅक केल्याचे ई-मेलमध्ये नमूद केले. याप्रकरणी मुख्याध्यापकांनी बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.























































