जालना – शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात एका अठरा वर्षीय विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कल्याण बापुराव कोलते (18) असे विद्यार्थ्याचे नाव आहे.

कोलते टाकळी (ता. फुलंब्री जि.संभाजीनगर) येथील कल्याण कोलते हा अंबड शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्षे मॅकेनिल शाखेत शिक्षण घेत होता. ओमशांती कॉलनीमध्ये केंद्रप्रमुख राऊत यांच्याकडे तो भाड्याने राहात होता. बुधवारी नेहमीप्रमाणे तो महाविद्यालयात जाऊन रुमवर आला. सायंकाळी त्याचा रुमपार्टनर निलेश राठोड हा महाविद्यालयातून माघारी आला असता रुमचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. फोनकॉल करूनही आतून प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता कल्याण गळफास घेऊन लटकल्याचे दिसले.

घटनास्थळी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पतंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णु चव्हाण, रामेश्वर मुळक सह आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल, मात्र रात्री उशिरा पर्यंत पोलीस पंचनामा व श्ववविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होती.