हॉलीवूड अभिनेता विल स्मिथ मुंबईत 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्कर सोहळ्यामधील थप्पड प्रकरणामुळे चर्चेत असलेला हॉलीवूड अभिनेता विल स्मिथ मुंबईत आला आहे. शनिवारी सकाळी तो मुंबईतील खासगी विमानतळावर स्पॉट झाला आहे. सद्गुरू जग्गी वासुदेव यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत काही वेळ घालवण्यासाठी तो आल्याची चर्चा आहे.

गेल्याच महिन्यात पार पडलेल्या ऑस्कर सोहळ्यात कॉमेडियन ख्रिस रॉक याने विल स्मिथच्या पत्नीची खिल्ली उडवली होती. मस्करी सहन न झाल्यामुळे स्मिथने त्याच्या कानशिलात लगावली होती. याप्रकरणी स्मिथने माफीदेखील मागितली होती, मात्र, ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील घटनेनंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खळबळ उडाली आहे. सध्या विल स्मिथ आणि त्याची पत्नी जाडा पिंकेट यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांची हॉलीवूडमध्ये चर्चा आहे. मनःशांतीसाठी तो मुंबईत आला असून काही धार्मिक विधी करणार असल्याचे बोलले जात आहे.