खूनाचा प्रयत्न करणाऱ्या सराईत टोळीला अटक; युनीट चारची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरतील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरूणावर खुनी हल्ला करून फरार झालेल्या टोळीला परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट चारने अटक केली. रोहीत सचिन शेंडगे, विवेक उर्फ मिठ्या प्रकाश गवळी (दोघे रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अनिल कालीदास विटकर ( रा. मश्जिद गल्ली जवळ, इंदिरानगर, लोहगाव ) यांनी तक्रार दिली आहे.

लोहगाव परिसरात मित्रांबरोबर गप्पा मारत उभे असताना सराईत आकाश सोनवणे याच्यासह इतर साथीदारांनी मिळून अनिलवर कोयत्याने वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी दुचाकीवरुन जात असताना परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हत्यारे हातात घेत आरडाओरडा केली. याप्रकरणी पथकाकडून तपास सुरू असताना सराईत विवेक आणि रोहित शेंडगे सादलबाबा दर्ग्याजवळील नदीपात्रात थांबल्याची माहिती पोलीस नाईक नागेशसिंग कुंवर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. ही कामगिरी उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, राजस शेख, नागेशसिंग कुंवर, दिपक भुजबळ, प्रविण भालचीम, संजय आढारी, कौस्तुभ जाधव, सागर वाघमार, वैशाली माकडी, शितल शिंदे यांनी केली.

मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या तरूणावर कोयत्याने वार केलेल्या दोघा सराईतांना अटक केली आहे. त्यांनी हातातील कोयत्याने परिसरात दहशत माजविली होती.
– जयंत राजूरकर, पोलीस निरीक्षक युनीट चार