देशातील पहिल्या महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्पास मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक गुरुवारी बोलवण्यात आली होती. याबैठकीत विविध मंत्रालयासंदर्भातील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

> डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी “सौर उर्जा कुंपणाचा” समावेश. (वन विभाग)

> देशातील पहिल्याच महाराष्ट्र जनुक कोष (Maharashtra Gene Bank) प्रकल्पास मान्यता (वन विभाग)

> येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदनिर्मिती (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग)

> पोलीस अधिकारी, अंमलदार यांना पूर्वीप्रमाणे शासकीय घरबांधणी अग्रिम देणार (गृह विभाग)

> विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग समाजाच्या आरक्षण व सवलतींचा, इतर लाभांचा सर्वकष अभ्यास करुन अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रिमंडळ उप समितीच्या शिफारशी. (इतर मागास बहुजन कल्याण)

> गळीत हंगाम 2021-2022 मधील अतिरिक्त उस गाळप करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सवलती वाहतूक उतारा व साखर उतारा घट अनुदान देण्यास मान्यता (सहकार विभाग)

> अठरा तालुक्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांना 100 टक्के अनुदान (उच्च व तंत्रशिक्षण)

> सामाजिक न्याय विभागाच्या चार महामंडळांची भागभांडवल मर्यादा वाढविली (सामाजिक न्याय व विशेष सहा्य)

> राज्यात विविध विभागांत रेडिएशन ओन्कोलॉजी युनिट, कॅथलॅब्स, शस्त्रक्रियागृहे, डायलिसिस यंत्रे स्थापन करणार (सार्वजनिक आरोग्य)