25 जिल्हा परिषदांमध्ये जागा वाढल्या, लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवल्या जागा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 2011 च्या जनगणेचा आधार घेऊन लोकप्रतिनिधींच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भातले विधेयक नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात मंजुर झाले होते. त्यावर राज्यपालांची सही झाली असून त्यासंदर्भातली अधिसूचना ग्रामविकास विभागाने आज जारी केली. त्यानुसार राज्यातील 25 जिल्हा परिषदांमध्ये जागांची वाढ आहे.

राज्यात 34 जिल्हा परिषदा आहेत. पैकी 25 जिल्हा परिषदांची मुदत संपल्याने त्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या 25 जिल्हा परिषदांमध्ये सध्या नव्या रचनेप्रमाणे 1 हजार 705 इतक्या झाल्या आहेत.

रायगड 66, रत्नागिरी 62, सिंधुदुर्ग 55, नाशिक 84, जळगाव 77, नगर 85, पुणे 83, सातारा 74, सांगली 68, सोलापूर 77, कोल्हापूर 76, संभाजीनगर 70, जालना 63, परभणी 60, हिंगोली 57, बीड 69, नांदेड 73, धाराशीव 61, लातूर 66, अमरावती 66, बुलढाणा 68, यवतमाळ 69, चंद्रपूर 62, वर्धा 57, गडचिरोली 57 अशी जागांची वाढ झाली आहे.