
अनेकदा व्हॉट्सऍप ग्रूपवरील आक्षेपार्ह मेसेजमुळे वाद निर्माण होतात. मात्र, आता चिंता करण्याची गरज नाही. कारण व्हॉट्सऍपच्या नवीन अपडेटमध्ये ग्रूप ऍडमिन अधिक पॉवरफुल होणार आहे. ग्रूपवरील कोणत्याही व्यक्तीचा आक्षेपार्ह मेसेज तो डिलीट करू शकणार आहे. आतापर्यंत ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ फीचर वापरून युजर फक्त स्वतः पाठवलेले व्हॉट्सऍप मेसेज डिलीट करू शकत होते. नवीन अपडेटनंतर आता ऍडमिन ग्रुपमधील कोणतेही आक्षेपार्ह मेसेज हटवू शकणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, ग्रुपची एकंदर कमांड ऍडमिनच्या हातात असेल.
याशिवाय मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सऍपने मेसेजेसवर वेगवेगळ्या इमोजीच्या रिऍक्शन्स देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. या नवीन फीचर्सनुसार युजर्स इमोजीच्या मदतीने मेसेजवर त्यांचा अभिप्राय देऊ शकतील. सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला फक्त सहा इमोजी मिळतील.






















































