
झेक रिपब्लिकमध्ये तब्बल 312 मीटर उंचीवरील जगातील सर्वात लांब झुलता पूल आहे. गेल्या दोन वर्षांपासून पुलाचे बांधकाम सुरू होते. आता तो पर्यटकांसाठी खुला झाला आहे. याचे फोटो व्हायरल होत आहेत.
सर्वात लांब झुलत्या पुलाला ‘स्काय ब्रिज 721’ असे नाव देण्यात आले आहे. नेपाळच्या बागलुंग परबत फूटब्रिजपेक्षा हा पूल लांब आहे. त्याने सर्वात लांब सस्पेन्शन फूटब्रिजसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हा पूल दोन पर्वतरांगाना जोडतो. तो दरीच्या वर 95 मीटरवर झुलत आहे. त्यात प्रवेश करण्यासाठी केबल कारचा उपयोग करण्यात येणार आहे. पूल साधारण दोन हजार 365 फूट लांब आहे. पर्यटक एक हजार 125 मीटर उंचीवरून त्यात प्रवेश करतील आणि 10 मीटर उंचीवरून बाहेर पडतील. ढगांनी आच्छादलेली जेनेस्की पर्वतांची प्रेक्षणीय दृश्ये बघत पुलावरून चालताना थरारक अनुभव पर्यटकांना घेता येतो.


























































