Pune Crime – दहशतीसाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतासह दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतासह दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतुसे असा 50 हजारांवर ऐवज जप्त करण्यात आला. रफिक उर्फ बबलु नबीलाल शेख (वय – 31, रा. दत्तवाडी) आणि प्रमोद उर्फ कमलेश कैलास घारे (वय – 31, रा. दांडेकर पुल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पिस्तूल बाळगणारे म्हात्रे ब्रीज परिसरात थांबल्याची माहिती पोलीस अमंलदार शिवाजी क्षीरसागर आणि हवालदार कुंदन शिंदे यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील लोहार, उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे यांनी दोघांना ताब्यात घेतले. रफिककडून पिस्तूल आणि प्रमोदकडून काडतुसे जप्त केली.

ही कामगिरी उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, एसीपी रामराजे निंबाळकर, एसीपी सुनिल पवार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, कुंदन शिंदे राजु जाधव, शिवाजी क्षीरसागर, प्रकाश मरगजे, अमित सुर्वे, दयानंद तेलंगे पाटील, विष्णु सुतार, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, भारत आस्मर, प्रमोद भोसले, शरद राऊत यांनी केली

आरोपी प्रमोद घारे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्याविरूद्ध गुन्हे दाखल आहेत. तर रफिक उर्फ बबलु याने जुन्या भांडणाच्या रागातून परिसरात दहशत करण्यासाठी पिस्तूल बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला पिस्तूलाचा विक्री करणाऱ्याचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.