
रोजगाराभिमुख व स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी राज्य तंत्रशिक्षण मंडळाने तंत्रनिकेतन पदविकेत बदल करत ‘आय स्कीम’ या नावाने अभ्यासक्रम आणले आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यवाढीसाठी चौथ्या सत्रानंतर सहा आठवडय़ांचे औद्योगिक प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. उन्हाळी सत्र परीक्षांचा कालावधी वाढल्याने मंडळाने या प्रशिक्षणाच्या वेळापत्रकातही बदल केला आहे.
तंत्रशिक्षण मंडळाने 2017 पासून पॉलिटेक्निकबरोबरच विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारक्षम बनविण्यासाठी प्रत्येक विषयाला मायक्रो प्रोजेक्ट, औद्योगिक प्रशिक्षण, काwशल्ये प्रात्यक्षिके, संवाद काwशल्य, मूल्यवर्धन शिक्षण, पर्यावरण, निरंतर मूल्यमापन शिक्षणावर भर दिला आहे. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार हे प्रशिक्षण 27 जून ते 6 ऑगस्ट या कालावधीत होणार होते, मात्र आता उन्हाळी परीक्षा कालावधी पुढे गेल्याने 4 जुलै ते 14 ऑगस्टदरम्यान प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.
पॉलिटेक्निकच्या प्रत्येक शाखेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण अनिवार्य केलेले आहे. या अभ्यासक्रमांतर्गत द्वितीय वर्षातील चौथे सत्र संपल्यानंतर सहा आठवडय़ांचे औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीजमध्ये होणारे कामकाज, तेथील मशिन्स, उत्पादन प्रक्रिया, मार्पेटिंग, मशीनची देखभाल अशा बाबींचा अभ्यास करून औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण रिपोर्ट तयार करणे बंधनकारक असणार आहे.






























































