आऊटसोर्सिंगविरोधात परिचारिकांचे काम बंद आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारने घेतलेल्या आऊटसार्ंसगच्या धोरणाविरोधात राज्यातील परिचारिका संघटनेकडून आज कामबंद आंदोलन पुकारण्यात आले. सरकारने सरळसेवेने परिचारिका भरतीचा निर्णय न घेतल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा इशारादेखील परिचारिका संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

आऊटसार्ंसगच्या धोरणाला रुग्णालयीन कर्मचाऱयांकडून सतत विरोध केला जात आहेत. सरळसेवा भरतीचेच धोरण योग्य असल्याचे कर्मचाऱयांचे म्हणणे असून यासाठी आज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेकडून दोन दिवसांच्या कामबंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याआधी दोन दिवस सकाळी 2 तास काम बंद आंदोलन केले, पण कोणत्याही मागण्या मान्य न झाल्याने आता दोन दिवस कामबंद आंदोलन असणार आहे. सरकारने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पुढे 25 तारखेपासून बेमुदत आंदोलन सुरू करू, असा इशारा परिचारिका संघटनांनी दिला आहे. बेमुदत संपावर जाण्याआधी सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा, असेही परिचारिका संघटनांनी म्हटले आहे.

मागण्या

सरळसेवेने कायमस्वरूपी पदभरती करा, केंद्राप्रमाणे जोखीम भत्ता द्या, कोरोनाकाळात बंद करण्यात आलेली साप्ताहिक सुट्टी सुरू करावी यासह अन्य मागण्या संघटनांकडून करण्यात आल्या आहेत. कोरोनाकाळात प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडल्यानंतरही सरकार मात्र आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही ही खेदाची बाब असल्याची खंत परिचारिका संघटनांनी व्यक्त केली आहे.

जे. जे. रुग्णालयात आंदोलन

 राज्यातील सरकारी रुग्णालयातील नर्सकडून 21 जूनपासून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. केंद्राप्रमाणे आम्हालाही जोखीम भत्ता द्या, या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील नर्सने कामबंद आंदोलन केले. यात जे. जे. रुग्णालयातील 375, सेंट जॉर्ज रुग्णालयातील 175 आणि जी. टी. रुग्णालयातील 100 परिचारिका सहभागी झाल्या होत्या. त्याचसोबत राज्यभरातील सर्व शासकीय रुग्णालयांतील परिचारिकांनी सहभाग नोंदवला.