
प्रत्येकजण आपल्या ध्येयानुसार आणि गरजांनुसार गुंतवणूक करत असतो. प्रत्येकाचे गुंतवणुकीची पद्धत आणि रक्कम बदलत असते. काहीजण जोखीम पत्करत नाहीत. त्यांमुळे ते म्युचुअल फंड, मुदत ठेव,पीपीएफ किंवा पोस्टातील विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काही जणांना कमी परतावा मिळाला तरी जोखीम नको असते. तर काहीजण थोडी जोखीम पत्करून चांगल्या परताव्याचा पर्याय निवडतात.
या दृष्टीने गुंतवणुकीचा विचार केल्यास पीपीएफ आणि म्युचुअल फंड हे चांगले पर्याय आहेत. मात्र, या दोघांमधील कोणता पर्याय अधिक फायदेशीर आहे. तसेच गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, याबाबत जाणून घेऊया.
पीपीएफमध्ये भविष्याचा विचार करून गुंतवणुकीसाठी मदत होतेच, त्याचबरोबर करातही सवलत मिळते. पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर खातेधारकाला व्याज मिळते. तसेच मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर द्यावा लागत नाही. या खात्यातील रक्कम सुरक्षित असते. तसेच आयकरात 80 सी द्वारे करात सूट मिळते. तसेच या योजनेत 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. तसेच व्याजदरातून निश्चित परताव्याची हमी असते. हे फायदे पीपीएफ गुंतवणुकीतून मिळतात.
म्युचुअल फंडमध्ये गुंतवलेला पैसा त्या फंडमधील अर्थतज्ज्ञ आणि सल्लागार योग्य ठिकाणी गुतंवतात. त्यातून मिळणाऱ्या फायद्यातून गुंतवणूकदारांना परतावा देण्यात येतो. फंडमधील अर्थतज्ज्ञ एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवत असल्याने जोखीम कमी होते. पीपीएफच्या तुलनेत म्युचुअल फंडमधून अधिक परतावा मिळतो. यातील गुंतवणूकीतील रक्कम तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य ठिकाणी गुंतवण्यात येते. एसआयपीसह एकत्र रक्कम गुंतवण्याचाही पर्याय मिळतो. म्युचुअल फंडमधील गुंतवणूक छोट्या रकमेपासूनही सुरू करण्यात येऊ शकते.
एखादा गुंतवणूकदार काही वर्षात एक कोटींचे लक्ष्य ठेवत दर महिन्याला 10 हजाराची गुंतवणूक करत असेल तर पीपीएफमधील गुतंवणूकीद्वारे कोट्यधीश होण्यास त्याला 27 वर्षे लागतील. सध्या पीपीएफवर 7.1 व्याज मिळते. व्याजदर दरवर्षी कमीजास्त होतात. त्यामुळे यात 7.5 सरासरी व्याजदर पकडला तरी 10 हजाराच्या गुतंवणुकीतून 27 वर्षात करोडपती होता येईल.
म्युचुअल फंडमधील गुतंवणुकीवर 10 ते 12 टक्क्यांचा परतावा मिळतो. तसेच यात चक्रवाढ व्याजाचाही फायदा मिळतो.यात दर महिन्याला 10 हजाराची गुतंवणूक केली आणि सरासरी 12 टक्के परतावा धरला तर कोट्यधीश होण्यासाठी 21 वर्षे लागतील. त्यामुळे पीपीएफपेक्षा म्युचुअल फंडात गुतंवणूक केल्यास जास्त परतावा मिळतो. तसेच गुंतवणूकीची रक्कमही कमी लागते. मात्र, यातील गुंतवणुकीत काही प्रमाणात जोखीम असते.























































