राज्य सरकारवर आरोप करण्याची फॅशनच आली आहे; सुप्रिया सुळे यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दररोज उठायचे आणि राज्य सरकारवर आरोप करायचे अशी फॅशनच राज्यात आली आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला. आता या आरोपांची गंमत वाटते असेही त्या म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळे या रविवारी धाराशिव दौऱयावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, संजय निंबाळकर व सुरेश पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती. भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा प्रचंड दुरुपयोग होत आहे. या यंत्रणा टाकणार असलेल्या धाडीची माहिती भाजपच्या नेत्यांना अगोदरच असते असा टोलाही त्यांनी लगावला. अनिल देशमुख, नवाब मलिक हे सूडाच्या राजकारणाचे बळी असल्याचा आरोपही त्यांनी केला.