
मोबाईल-टीव्ही माध्यमांकडे आकर्षित झालेली मुले वाचनापासून दूर जात आहेत. मुलांना वाचनाची गोडी लागावी, यासाठी दादर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बालवाचनालय उपक्रम विनामूल्य चालवला जात आहे. यंदाही 2 मे ते 11 जून या कालावधीत मोफत बालवाचनालय सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आज बालवाचकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र काढून त्यांना अभिवादन केले. मुलांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले.
दासावामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. नामदेव शिंदे यांनी शिवराज्याभिषेक सोहळय़ाचे चित्र रेखाटले व मुलांना चित्र कसे काढायचे याबाबतची माहिती दिली. यावेळी शिवाजी महाराजांवरील पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले.

























































