
दक्षिण कश्मीरच्या कुलगाममधील गोपालपोरा सरकारी हायस्कूलला आता शिक्षिका रजनी बाला यांचे नाव देण्यात येणार आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी बुधवारी एका कार्यक्रमात याबाबत घोषणा केली. 31 मे हायस्कूलमध्येच रजनी बाला यांची दहशतवाद्यांनी गोळय़ा झाडून हत्या केली होती. सिन्हा यांनी बुधवारी बाला यांच्या कुटुंबीयांची सांभा येथील निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
























































