कंपनीतून अ‍ॅल्युमिनियम चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कंपनीतून अ‍ॅल्युमिनियम पट्टयांची चोरी करणाऱ्या त्रिकुटाला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आकाश अशोक मांजरेकर (वय 28 रा. गुलटेकडी,) कृष्णा दत्तात्रय शिंदे (वय 33 रा. कात्रज) आणि विशाल रमेश रांगडे (वय 24 रा. जांभुळवाडी रस्ता, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिल राठोड (वय 38) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल आहे.

पर्वती इंडस्ट्रीज इस्टेट परिसरातील विक्रम प्रिंटर्स प्रायव्हेट लिमीटेडमधून तीन कामगार चोरट्यांनी अ‍ॅल्युमिनियम पट्टयांची चोरी केली होती. याप्रकरणी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक पेट्रोलिंग करीत असताना चोरटे गंगाधाम परिसरात थांबल्याची माहिती पोलीस अमलदार सुमित ताकपेरे यांना मिळाली.

त्यानुसार तिघांना ताब्यात घेतले असता चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, शाहिद शेख, सुमीत ताकपेरे, नीलेश शिवतरे, गणेश ढगे यांनी केली.