डॉ. हेमराज शहा यांची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे बृहन्मुंबई गुजराती समाजाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हेमराज शहा यांची ‘वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. 26 जून रोजी इंदूर येथे एका शानदार सोहळय़ात शहा यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्ड’ पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. 1980 पासून हेमराज शहा हे दरवर्षी कच्छी नवीन वर्ष गीत संगीत यांची रेलचेल असलेल्या कार्यक्रमाने साजरे करत असल्याने त्यांची ‘वर्ल्ड रेकार्ड’मध्ये नोंद झाली आहे. तसेच देशभरातील नावाजलेल्या कच्छी बांधवांचा ‘कच्छ शक्ती नॅशनल अॅवॉर्ड’ देऊन गौरव करतात. आतापर्यंत एक हजारहून अधिक कच्छी बांधवांना त्यांनी सन्मानित केले आहे.