प्रशिक्षण काळात सीनियर्स मलाही मालीश करायला लावायचे – दुती चंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मी प्रशिक्षणासाठी भुवनेश्वरच्या स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये असताना मलाही सीनियर्स खेळाडूंकडून रॅगिंगचा त्रास सहन करावा लागलाय. मी जुनियर असल्यामुळे सीनियर्स ऍथलीटस मला बळजबरीने त्यांचे मालीश करायला लावायचे, अशी आपबिती नामवंत आंतरराष्ट्रीय महिला धावपटू दुती चंद हिने रविवारी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मांडली आहे.

भुवनेश्वरच्या सरकारी स्पोर्टस् हॉस्टेलमध्ये शनिवारी एका अंडर ग्रॅज्युएट युवा क्रीडापटूने रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यावर बोलताना दुती हिने 2006 ते 2008 या काळातील आपल्यावर झालेल्या हॉस्टेलमधील अन्यायाची माहिती उघड केली आहे.