
आक्षेपार्ह मजकुराला लगाम लावण्यासाठी मेटाच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक ऍक्शन मोडवर आले आहे. मे महिन्यात फेसबुकने हिंदुस्थानातील तब्बल 1.75 कोटींहून अधिक पोस्ट हटवल्या आहेत, अशी माहिती कंपनीच्या मासिक अहवालाद्वारे देण्यात आहे.
1 मे ते 31 मे यादरम्यान हिंदुस्थानात 13 श्रेणीअंतर्गत फेसबुकने ही कारवाई केली आहे. छळ, दबाव, हिंसा, धोकादायक संस्था व व्यक्ती आणि लैंगिक पोस्ट हटवल्या आहेत, असेही अहवालात नमूद आहे. याच कालावधीत फेसबुकचा दुसरा प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामने 12 श्रेणीअंतर्गत 41 लाख पोस्ट हटवल्या आहेत.


























































