पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी एक्सप्रेसमधून मारली उडी, आरोपीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरफोडीतील आरोपीने धावत्या एक्सप्रेसमधून उडी मारून पळून जायचा प्रयत्न केला. जखमी झालेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तबारत रयनी उर्फ चिनके असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली आहे.

काही दिवसांपूर्वी कांदिवली येथे घरपह्डी झाली होती. त्या घरपह्डीच्या गुह्यात चिनकेचा सहभाग आढळून आला होता. घरपह्डी केल्यानंतर तो उत्तर प्रदेशला गेला होता. याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळाली. त्याच्या अटकेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोहम कदम, जैतापकर, राऊत, केसरकर यांचे पथक उत्तर प्रदेशला गेले. त्याला लालिया पोलिसांच्या मदतीने अटक केली. पुढील चौकशीसाठी त्याला लखनौ येथून मुंबईत आणण्यात येत होते. गुरुवारी सायंकाळी एक्सप्रेस मनमाड जंक्शन येथे थांबली. तेव्हा चिनकेने लघुशंकेचा बहाणा करून पोलिसांच्या हाताला झटका देऊन धावत्या एक्सप्रेसमधून उडी मारली. त्यामुळे त्याच्या हाताला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. काही अंतरावर एक्सप्रेस थांबल्यावर पोलिसांनी शोध घेतला असता चिनके हा पटरीवर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांनी त्याला नाशिकच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.