हरकती, सूचनांवर प्रशासकच निर्णय घेणार; सुनावणीशिवाय ओबीसी आरक्षण अंतिम होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ‘ओबीसी’ आरक्षणाची सोडत 2हे. या जाहीर आरक्षणावर 30 जुलैपासून 2 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत नागरिकांना हरकती-सूचना दाखल करता येतील. मात्र हरकती-सूचनांवर पालिका आयुक्त प्रशासकच अंतिम निर्णय घेणार असल्याचे पालिकेच्या निवडणूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

सर्वेच्च न्यायालयाने ‘ओबीसी’ आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास परवानगी दिल्यामुळे निवडणूक आयोगानेही 22 जुलै रोजी सर्व महापालिकांना निवडणुकीसाठी ‘ओबीसी’ आरक्षणानुसार नव्याने सोडत काढण्याचे निर्देश दिले. यानुसार पालिकेने 31 मे रोजी जाहीर केलेल्या आरक्षणाच्या सोडतीनुसार सर्वसाधारण 219 जागांमधूनच ‘ओबीसी’चे आरक्षण जाहीर करणार आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठीच्या जाहीर झालेल्या आरक्षणात कोणताही बदल होणार नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले. 2017 च्या निवडणुकीत 227 जागा असताना ओबीसीसाठी 61 जागा होत्या, मात्र आता 9 वाढीव प्रभागांमुळे ओबीसींसाठी 63 जागांचे आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे. हे आरक्षण सर्वसाधारण 219 जागांमधून जाहीर होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत अशी झाली कार्यवाही

मुंबई महानगरपालिकेच्या वाढलेल्या 9 प्रभागांसह एकूण 236 प्रभागांच्या आरक्षणाची सोडत पालिकेने 31 मे रोजी काढली होती. यामध्ये प्रत्यक्ष लॉटरी पद्धतीने 32 प्रभागांचे तर 204 जागांवर ‘प्राधान्यक्रमाने’ आरक्षण जाहीर करण्यात आले होते.

एकूण 236 जागांमध्ये 118 महिला तर 118 जागा पुरुषांसाठी राखीव बनल्या होत्या. यामध्ये अनुसूचित जाती – 15, अनुसूचित जमाती 2 आणि सर्वसाधारणसाठी 219 जागा निश्चित झाल्या होत्या, मात्र न्यायालयाच्या निर्देशांमुळे ‘ओबीसी’ आरक्षणही जाहीर होणार आहे. 24 ठिकाणी दाखल करा हरकती, सूचना9 जुलै रोजी वांद्रे येथील ‘बालगंधर्व रंगमंदिर’मध्ये सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे.

पालिकेच्या 2022 च्या निवडणुकीसाठी जाहीर होणाऱया ‘ओबीसी’ आरक्षणावर नागरिकांना हरकती, सूचना दाखल करण्यासाठी 24 वॉर्डमध्ये 24 ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 24 वॉर्ड ऑफिसमधील सहाय्यक कर निर्धारक आणि संकलक यांच्या कार्यालयात हरकती, सूचना दाखल करता येणार आहेत. या हरती, सूचनांवर आवश्यक कार्यवाही करून 5 ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.