
अजूनही आपल्याकडे एक समाज आहे आणि तो खरा आहे. जुनी हाडे मजबूत असतात. म्हणजे काय.. वय वाढल्यानंतरही शरीर निरोगी, तंदुरुस्त आणि चपळ असणे. पण आजच्या धकाधकीच्या जगण्यात खूप लवकर आपल्या शरीराची झीज होऊ लागते. साधारणत: ३० ते ४० च्या वयात हाडांची घनता कमी होऊ लागते. रक्तवाहिन्या कडक झाल्याने रक्तदाब वाढू लागतो. या वाढत्या वयाला जर रोखायचे असेल तर चार गोष्टींची चतु:सूत्री पाळायला हवी.
* झोप – फक्त चार तास झोपेने १० वर्षं आधीच वृद्धत्व. ठराविक वेळेत झोपणे आणि जागे होणे ही सवय अंगी बाणवा. सरासरी ७ ते ८ तास झोप घ्या.
* आहार – मैदा, साखर, तेल शरीरातून पोषक तत्वे शोषून घेतात. त्यामुळे शरीरात जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता निर्माण होते. आहारात तीन भाग फळे आणि भाज्या असाव्यात. एक भाग धान्य आणि इतर गोष्टी घ्या. शरीराला पूर्ण पोषण मिळेल.
* वजन – वाढत्या वयानुसार पेशींचे चयापचय आणि उर्जा संतुलित करणारे हार्मोन्स कमी होतात. यामुळे वजन वाढते. यासाठी आठवड्यातून तीन दिवस ३० ते ४० मिनिटांचा व्यायाम आपल्याला १० वर्षे तरुण ठेवतो.
* ताण तणाव लांब ठेवा – दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने अनेक आजारांना निमंत्रण मिळते. तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगासने, प्राणायाम नियमित करावे.
























































