
राजधानी दिल्लीत बुधवारी मंकीपॉक्सचा चौथा रुग्ण आढळला. त्यामुळे देशातील मंकीपॉक्सच्या रुग्णांची संख्या 9 झाली आहे. मूळ परदेशी नागरिक असलेल्या व सध्या दिल्लीत राहणाऱया 31 वर्षीय तरुणीला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. तिला लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल केले आहे.
तिला ताप तसेच त्वचेसंबंधी त्रास जाणवू लागला होता. राजधानीत मंकीपॉक्सची रुग्णसंख्या वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शहरातील तीन खासगी रुग्णालयांना विलगीकरण कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


























































