
गुन्हा दाखल न करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच घेणाऱया शेवगाव उपविभागीय कार्यालयातील पोलीस हवालदाराला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान, नगर जिह्यात सलग दुसऱया दिवशी पोलिसांवर झालेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. संजय बडे (वय 52, पोलीस हवालदार, नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव) असे या पोलीस कर्मचाऱयाचे नाव आहे.
मुरुमाचा उपसा केल्याने तक्रारदारावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. गुन्हा दाखल न करण्यासाठी व त्यांचा जेसीबी जप्त न करण्यासाठी हवालदार संजय बडे याने 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.


























































