मुंबईत पावसाची दमदार हजेरी   

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांना गुरुवारी मध्यरात्रीपासून कोसळणाऱया दमदार सरींमुळे मोठा दिलासा मिळाला. तर शुक्रवारी दिवसभरही थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.    

जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात मात्र पावसाने दडी मारली. त्यामुळे ऊन आणि आर्द्रतेमुळे मुंबईकर उकाडय़ाने हैराण झाले होते. गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने मुंबई शहर त्याचबरोबर पूर्व आणि पश्चिम उपनगरात दमदार हजेरी लावली. शुक्रवारीही दिवसभरात मुंबईच्या विविध परिसरात अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. दरम्यान, मुंबई, कोकणासह राज्यभरात येत्या रविवारपासून मान्सून सक्रिय होणार आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.