
मोबाईल आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. त्यामुळे डेटा सुरक्षेबाबत प्रत्येक कंपनी काळजी घेत असते. तरीही काही त्रुटी असतात. आता लवकरच लाँच होणाऱया अँड्रॉईड -13 मध्ये अशाच काही त्रुटी आढळून आल्या आहेत. गुगललाही त्याबाबत माहीत नव्हते. इंदूरच्या अमन पांडे या तरुणाने अँड्रॉईड -13 मधील असे एक- दोन नव्हे तर 49 बग शोधून काढले आहेत. त्यापैकी दोन बग युसर्जसाठी फारच धोकादायक होते.
गुगल यावर्षी अँड्रॉईड -13 लाँच करणार आहे. हे अँड्रॉईडचे नव्हे व्हर्जन आहे. नवीन काही लाँच करण्यापूर्वी गुगलकडून आपल्या उत्पादनांच्या बीटा आणि अल्फा व्हर्जनला तज्ञांकडे पाठवले जाते. अमन यांच्याकडेही फेब्रुवारी 2022 मध्ये अँड्रॉईड -13 चे बीटा व्हर्जन आले होते. अमन आणि त्यांच्या टीमने यामधील त्रुटी शोधल्या. तब्बल 49 त्रुटी शोधून काढण्यात त्यांना यश आले. अमन पांडे यांची कंपनी बग्स मिरर आता अँड्रॉईड – 13 मध्ये सर्वाधिक त्रुटी शोधणारी जगातील टॉप बग शोधक कंपनी बनली आहे.
























































