
महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने शनिवारी इतिहास रचला. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानला स्टीपलचेसमध्ये पदक जिंकून देणारा अविनाश हा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर अविनाशने राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला असून रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.
अविनाशची 3000 मीटर स्टीपलचेस ही शर्यत चांगलीच रंगतदार झाली. शर्यतीच्या अंतिम फेरीत त्याने केनियन खेळाडूंना कडवी टक्कर दिली. अविनाशने 8ः11ः20 सेपंदाच्या राष्ट्रीय विक्रमी वेळेसह रौप्यपदक जिंकले. हिंदुस्थान आणि केनिया यांच्यामध्ये यावेळी कडवी झुंज पाहायला मिळाली. चौथ्या क्रमांकावर असलेल्या अविनाशने अखेरच्या राऊंडपर्यंत हे स्थान कायम राखले होते. त्यावेळी अविनाश रौप्यपदक पटकावेल असे कोणालाही वाटले नव्हते. अखेरच्या लॅपमध्ये अविनाशने मुसंडी मारली आणि थेट रौप्यपदकाला गवसणी घातली. आतापर्यंत एकाही हिंदुस्थानीला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये पदक जिंकता आले नव्हते, पण अविनाशने यावेळी कमालच केली.
विनेश, रवी दहियाला सुवर्ण
पैलवान रवी दहिया याने 57 किलो वजनी गटात, तर विनेश पह्गाट हिने 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.


























































