
पश्चिम बंगालच्या बीरभूम येथे सरकारी बस आणि रिक्षा यांमध्ये झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. या घटनेत 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले.
ही घटना बीरभूम येथील मल्लारपूर परिसरातील महामार्गावर झाली. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी बस सिउरीच्या दिशेने येत होती. त्यांच्या समोर आलेल्या रिक्षाची बससोबत भीषण टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षा पलटली आणि त्यात प्रवास करणारे मजूर रस्त्यावर फेकले देले. या दुर्घटनेत रिक्षात बसलेल्या 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं. तसंच जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

























































