रत्नागिरी जिल्ह्यात नाकाबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हरीहरेश्वर येथे संशयास्पद बोट सापडल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व चेकपोस्टवर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. समुद्रकिनाऱ्यावरही बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मच्छिमार नौकांची तपासणी करण्यात आली.