
भाजप नेत्या, अभिनेत्री सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी आज खळबळजनक माहिती समोर आली आहे. हणजुणे येथील कार्लीस बारमध्ये एका पार्टीदरम्यान सोनालीला पेयातून ड्रग्ज दिल्याचे सीसीटीव्हीत दिसत असल्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोनाली फोगाट यांचा स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग याला अटक केली आहे.
संशयितांनी पेयातून दिलेल्या ड्रग्जमुळेच सोनाली बेशुद्ध झाली होती, त्या अवस्थेतच तिला दोन तास स्वच्छतागृहात सोडल्याचा संशय पोलिसांना आहे. पुराव्याशी छेडछाड होऊ नये म्हणून पोलिसांनी सोनालीच्या स्वीय सहाय्यकासह दोघांना अटक केली आहे.
























































