
माटुंगा येथील प्रि. एल. एन. वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन करण्यात आले. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) हा विद्यार्थ्यांना सरकार, मंत्रालये, विभाग, उद्योग आणि इतर संस्थांसमोरील ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलने राबवलेला एक देशव्यापी उपक्रम आहे. एसआयएच ही स्पर्धा 2017 सालापासून दरवर्षी एसआयएच सॉफ्टवेअर आणि एसआयएच हार्डवेअर एडिशन्स अशा दोन गटांमध्ये घेतली जाते. ही स्पर्धा उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते.

























































