चायना टेलिकॉमला ‘गगनचुंबी आग‘

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनच्या चांगशा शहरातील ‘चायना टेलिकॉम’च्या 42 मजली गगनचुंबी इमारतीला शुक्रवारी भीषण आग लागली. त्यामुळे आकाशाला गवसणी घालणारी ही इमारत पुरती काळवंडून गेली आहे. आगीत जीवितहानी झाली का, किती नुकसान झाले याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सदरची इमारत चांगशा शहराच्या मध्यभागी असल्याने संपूर्ण शहरातून धुराचे लोट दिसत होते.