टाकाऊ वस्तूंपासून बनवलं  एटीएम मशीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टाकाऊ  वस्तूंपासून एटीएम मशीन तयार करण्याची करामत दहावीच्या विद्यार्थ्याने केली आहे. भरत जोगल असे या मुलाचे नाव असून तो राजस्थानच्या बारमेर येथील आहे. त्याने स्वतः कधी एटीएम वापरलेले नाही. मात्र एटीएम मशीन तयार करून सर्वांना थक्क केले आहे.

भरतने बनवलेल्या एटीएम मशीनमधून शंभर, दोनशे रुपये नव्हे तर एक- दोन रुपयांची नाणी देखील काढता येतात. त्यासाठी त्याने मशीनमध्ये वेगवेगळे बॉक्स तयार केले आहेत. मशीनसाठी त्याने घरातील वायर, कागद, रबर, झाकण, मोटर तसेच अन्य टाकाऊ वस्तूंचा वापर केला. केंद्र सरकारच्या एका योजनेंतर्गत भरतने शाळेसाठी प्रोजेक्ट म्हणून ही मशीन तयार केली आहे.  त्याच्या प्रोजेक्टची आधी राज्यस्तरावर आणि आता राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. भरतची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. वडील मजुरी करतात.