शिंदे-फडणवीसांमुळेच राज्यातील उद्योग गुजरातला – विनायक राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहेत. लाखो तरुणांचे रोजगार बुडत आहेत. राज्याचा विकास रखडला तो शिंदे-फडणवीस सरकारमुळेच, असा आरोप शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांनी केला. यावेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, आमदार मनीषा कायंदे, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, उपनेत्या संजना घाडी, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, माजी नगरसेवक नामदेव माने, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत संपर्क प्रमुख उद्धव कदम, माजी नगरसेवक संजय घाडी, बजरंग दल उत्तर मुंबई सहमंत्री योगेश दुबे, हिंदू परिषद उत्तर मुंबई जिल्हा मंत्री बी. एल. भारद्वाज, मागाठणे विभागप्रमुख उदेश पाटेकर, विधानसभा संघटक भास्कर खुरसुंगे, विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, संध्या दोशी, सुजाता पाटेकर, तेजस्वी घोसाळकर, विजय दारूवाले, शिवसेना, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.